Events

Upcoming Events

"पचपन से बचपन तक-2025"

“जरा विसावू या वळणावर”
हातात न राहणारी गोष्ट म्हणजे वय. या वयाच्या नंतर नुसत्या आठवणीच राहतात. ज्या मनाच्या कोपऱ्यात घर करून आयुष्यभर राहतात. काहीतरी गोष्ट करायची राहून गेली असते, कोणाला काही बोलायचे राहिले असते, काही सुप्त भावना फक्त मनात असतात सगळा काळ निघून गेल्यावर फक्त विचार मनात राहिलेले असतात. असे राहून गेलेले क्षण खरोखर जगायची संधी पुन्हा मिळाली तर? आयुष्याच्या या वळणावर पुन्हा लहान होता आले तर?
हो. हे नक्की शक्य आहे सावली सोशल सर्कल आयोजित ‘पचपन से बचपन तक’ या ज्येष्ठांच्या निवासी शिबिरात. गेली ३ वर्षे ज्येष्ठ मंडळीना आनंदाचे क्षण गोळा करायला या शिबिराने चांगलीच साथ दिली आहे. या वर्षीचे हे शिबीर आंबा येथे निसर्गाच्या कुशीत असलेल्या रिसोर्ट मध्ये दिनांक १५ ते १९ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले गाव, जंगल, पाण्याचे झरे धबधबे सगळ वातावरणच आनंददायी असणार आहे. ५ दिवसांच्या थीम्स वेगळी वेगळी असेल. ज्यात तुम्ही नितांत आनंद उपभोगू शकाल. असे हे शिबीर.
शुल्क रुपये ४,५०० प्रत्येकी (यामध्ये रिसॉर्ट मध्ये निवास आणि आहार व्यवस्था यांचा समावेश आहे)
राहण्याची सोय (एका खोलीत ४ जण)
मग येताय ना, आयुष्याच्या या वळणावर विसावा घ्यायला…
पुन्हा एकदा नव्याने तरुण व्हायला…
संपर्क
सावली सोशल सर्कल
कोल्हापूर
सागर : 8999878519
सौरभ : 9975215315

प्रेस नोट - कृपया प्रसिद्‌धीसाठी

२९/०८/२०२५

भारत विकास परिषद पुणे शिवाजीनगर शाखा, व दिव्यांग केंद्र पुणे आणि सावली केअर सेंटर, कोल्हापूर,

संयुक्त आयोजित

२०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय आणि हात व पोलिओ कॅलिपर मोफत बसविण्यासाठी मोजमाप शिबिर कोल्हापूर दि. १३ सप्टेंबर

भारत विकास परिषद ही सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे. दिव्यांगाना कृत्रिम अवयव बसविणे हा प्रमुख राष्ट्रव्यापी सेवा प्रकल्प आहे. भारतातील १२ विकलांग केंद्रांपैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी पुणे येथील दिव्यांग केंद्र गेल्या 25 वर्षांपासून अखंड कार्यरत आहे. भारत विकास परिषदेच्या महाराष्ट्र स्तरावर मोफत दिव्यांग शिबीर घेणाऱ्या दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे तर्फे दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात, व कॅलिपर बसविण्यात येतात. तसेच सदर दिव्यांग केंद्रातर्फे एपिल २०२५ मध्ये एकाच शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम केला आहे त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली.

सावली केअर सेंटर, कोल्हापूर ही अनेक सामाजिक कार्य करणारी संस्था असून त्यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२२ मध्ये कोल्हापूर येथे असेच मोफत दिव्यांग शिबीर घेण्यात आले होते. भारत विकास परिषदेचे पदाधिकारी श्री. मंदार जोग यांनी उपस्थितांचे स्वागत करून शिबिराची प्रस्तावना केली. विश्वस्त व दिव्यांग केंद्रप्रमुख श्री. विनय खटावकर पुणे, यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि आधुनिक मॉडयूलर पायाविषयी माहिती दिली. माहिती देताना ते म्हणाले आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची कमर्शियल किमंत रु. ५० हजारापेक्षा जास्त व कृत्रिम हाताची कमर्शियल किमंत २५ हजारापर्यंत आहे असे कृत्रिम अवयव ह्या शिबिरात ३०० दिव्यांगांना मोफत देणार आहोत. परंपरागत जयपूर फूट पेक्षा हे आधुनिक मॉड्यूलर कृत्रिम पाय ऑटोफोल्ड असून वजनाने हलके आहेत. आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय बसविल्यानंतर दिव्यांग व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालविणे व शेती कामे इ. प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात. त्याबाबत तज्ञांमार्फत त्यांना मार्गदर्शनही केले जाते.

कोल्हापूर व जवळपासच्या सर्व जिल्ह्यांतील दिव्यांगांना विनंती आहे की त्यांनी शिबिरासाठी फोन द्वारे पूर्व नोंदणी करावी. (पूर्व नोंदणी शिवाय शिबिरात प्रवेश नाही.)

संपर्क – कुणाल-9096959751 आणि ऋषिकेश-7875701187

सावली केअर सेंटर, कोल्हापूर, ५१/२ पिराची वाडी, राधानगरी रोड, कोल्हापूर येथे शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व दिव्यांगांची कृत्रिम अवयवासाठी मापे घेण्यात येणार आहेत. दिव्यांग व सोबती यांचेसाठी मोफत भोजन, चहा इ. सोय आहे अशी माहिती देऊन सावली केअर सेंटरचे प्रमुख श्री. किशोर देशपांडे यांनी आभार व्यक्त केले.

दिव्यांगांसाठी कृत्रिम अत्याधुनिक मॉडयुलर पाय (ज्याची कमर्शियल किंमत ५० हजारापेक्षा जास्त येते) आणि हात व कॅलिपर मोफत बसविले जाणार आहेत.

Events Gallery

No Images Found!

शिवचाफा महोत्सव