
IADVL (The Indian Association of Dermatologists, Venereologists, and Leprologists)
यांच्यातर्फे आज दिनांक १३ जुलै , २०२५ रोजी सावली केअर सेंटर, पिरवाडी येथे 'मोफत त्वचारोग तपासणी शिबीर ' घेण्यात आले. तपासणी दरम्यान रुग्णांना मोफत औषध वाटपही करण्यात आले. यासाठी १४ त्वचारोग तज्ञ उपस्थित राहिले होते, यामध्ये कोल्हापूर डरम्याटोलॉजिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष, डॉ. बाळकृष्ण निकम, सान्वी निगडे (सेक्रेटरी, कोल्हापूर डरम्याटोलॉजिस्ट असोसिएशन ), डॉ. विनोद कदम, डॉ. विनयश्री मेने, डॉ. रचना कुमार, डॉ. महेंद्र डांगरे, डॉ. प्रमोद बागवाडे, डॉ. प्रियदर्शनी जाधव, डॉ. पूजा बोडें, डॉ. स्वीडली फर्नांडीस, डॉ. सुदर्शन गौरकर उपस्थित होते. सावली केअर सेंटर पिरवाडी, सावली केअर सेंटर नाळे कॉलनी आणि मायसावली केअर सेंटर, मोरेवाडी येथील एकूण १०८ रुग्ण तसेच कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांनीही शिबिराचा लाभ घेतला.
